काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयाने उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियमवर दि. (10) रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून या शाळेची नांदेड विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उस्मानाबाद येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत 14 वर्ष वयोगटात कु.लोहार तनूजा बाळसाहेब हिने 32 किलो वजन गटातून प्रथम क्रमांक मिळवला व 19 वर्षे वयोगटातून कू.चुंगे ज्ञानेश्र्वरी संतोष हिने 52 किलो वजन गटातून प्रथम क्रमांक पटकावला तर मुलांच्या 14 वर्षीय वयोगटातून 50 किलो खालील वजन गटातून झोंबाडे शशिकांत बळीराम याने प्रथम क्रमांक तर 40 किलो वजन गटातून कु.पठाडे सानिका संतोष व पठाण इरफान हमीद यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे त्र्यंबकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते,उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पाटील,सचिव .यशवंत लोंढे, संचालक नागनाथ मसुते, जितेद्रं माळी, महेश जगाताप, अब्बास पटेल, सौ. मुक्ताबाई पाटील (सर्व संचालक मंडळ) सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच दत्तात्रय वडणे, मुख्याध्यापक जाधव एस. के, पर्यवेक्षक रामपूरे के. आर., ज्येष्ठ शिक्षक म्हमाणे एम', एन, हलकरे यांच्यासह सर्व संचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडुंचे अभिनंदन केले.
या सर्व यशस्वी खेळाडुंची नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून या खेळाडुस क्रीडा शिक्षक जाधव पी.पी. व माळी एम.जी. यांचे मार्गदर्शन लाभत आहे.