पुणे (राजेश पाटील) :-

ग्रामिण भागामधले अनेक प्रश्‍न आजही सुटलेले नाहीत. त्यामुळे ग्रामिण पत्रकारांनी आपल्या लेखणीतून ग्रामिण व्यवस्थचे लिखान वेळोवेळी केले पाहीजे. तरच ग्रामिण व्यवस्थेचे प्रतिबिंब खर्‍या अर्थाने जगासमोर उमटेल. असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार जथा साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

        सम्यक पुणे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संज्ञापण व वृत्तपत्रविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.7) रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे  ग्रामिण पत्रकार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना  ग्रामिण पत्रकारिता आणि आव्हाने या विषयावर संबोधित करताना ते बोलत होते. या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या रझिया पटेल  तर प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक उत्तम कांबळे, कवयत्री दिशा शेख, डॉ.उज्वला बर्वे, डॉ.स्वाती देहाडराय आदी उपस्थित होते.

       यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उत्तम कांबळे म्हणाले की, ग्रामिण पत्रकारांपुढे बातमीदारी करीत असताना आजही अनेक आव्हाने उभा राहिलेली आहेत. गावगाड्याच्या वास्तवाचे ग्रामिण पत्रकाराला लिखान करायचे असेल तर त्याला तशी संधी दिली जात नाही.आजच्या पत्रकारितेमध्ये शहरांच्या प्रश्‍नांना जिथके महत्व दिले जाते, तिथकेच महत्व ग्रामिण प्रश्‍नांनाही दिले पाहिजे. परंतू तसे होताना दिसून येत नाही. उत्तम कांबळे असेही म्हणाले की, सम्यकने राज्यातील ग्रामिण पत्रकारांना सुरक्षित गर्भपात सेवा आणि लिंगभेदावर आधारित लिंगनिवडीची समस्या आणि पत्रकारांची भूमिका या विषयावर दिलेले प्रशिक्षण नक्कीच महत्वाचे आहे. त्यातून ग्रामिण पत्रकारांच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडून त्यांना चांगली बातमीदारी करता येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षणे ग्रामिण भागात होणे गरजेचे आहे, असल्याचे मनोगत उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.


या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सम्यक संस्थेचे  संचालक आनंद पवार यांनी तर सुत्रसंचालन शिरिष वाघमारे यांनी केले व आभार प्रज्ञा मोळावडे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता  प्रा.स्नेहा गोळे, प्रा.योगेश बोराटे, शिरीष वाघमारे, संदीप आखाडे, मुक्ती साधना,बळीराम जेठे,महानंदा चव्हाण, भारत करळे यांनी परिश्रम घेतले.

संवेदनशिल लेखणीचा सन्मान

रााज्यातील ग्रामिण पत्रकारांनी वृत्तपत्रांमधून स्त्रीयांच्या सुरक्षित गर्भपाताबरोबरच पीसीपीएनडीटी आणि एमटीपी या दोन्ही कायद्याची तसेच स्त्रियांच्या अन्य प्रश्‍नांची माहिती संवेदनशिलपणे लेखणीतून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविल्याने सम्यकचे कार्य शेवटच्या घटकापर्यंत जावून पाहचले. त्यामुळे सम्यककडून त्यांचा गौरव आयोजित  करण्यात आला होता. यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यातील पत्रकारांचा समावेश होता. यात सांगली जिल्ह्यातील  तुळजापूर लाइव्ह चे विशेष प्रतिनिधी राजेश पाटील (पत्रकार ,वायफळे/तासगांव)यांना मान्यवरांच्या हस्ते संविधान प्रत आणि गौरवपत्र देवून गौरविण्यात आले.
 
Top