काटी :

तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक  तथा तुळजापूर  तहसील  कार्यालयातील सेवानिवृत्त पेशकार अभिमान  दत्तु गाटे  वय (68)  यांचे सोमवार  दि. (17 ) रोजी  सायंकाळी  8:30 वाजता प्रदीर्घ  आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या  पश्चात  पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुन,  एक भाऊ, एक  बहीण  असा परिवार आहे. ते पोलीस  अभिजित  गाटे यांचे वडिल  होते. 

त्यांच्या  पार्थिवावर  मंगळवारी  सकाळी  दहा वाजता येथील हिंदू  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व स्तरातील  लोक  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.   त्यांच्या अकाली जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

 
Top