मुक्तार चाऊस

लोहारा : इकबाल मुल्ला

लोहारा तालुका राष्टृवादी कॉग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी शहरातील मुक्तार चाऊस यांची दुस-यांदा फेर निवड करण्यात आली.

अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष इलियास पिरजादे यांनी चाऊस यांची दुस-यादा निवड  करुन अल्पसंख्यांक विभागाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष इलिया पिरजादे, प्रदेश चिटणीस मसुदभाई शेख, माजी नगराध्यक्ष खलिफा खुरेशी, उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील, तालुका अध्यक्ष किशोर साठे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, शहराध्यक्ष आयुब हबीब शेख आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top