सांगली : राजेश पाटील
विटा (सांगली)  कै. जगन्नाथ तात्या कदम कला,क्रीडा व्यायाम मंडळ  येथील कदम वाड्याचा राजा या गणेशोत्सव मंडळतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि 19 रोजी 'लागीर झालं जी'या मालिकेतील जयडी( किरण ढाणे)ही अभिनेत्री विट्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
         विटा पोलीस स्टेशन पाठीमागे असणाऱ्या कदम वाड्याचा राजा येथील गणपतीची महाआरती ही 'जयडीच्या' हस्ते होणार असुन प्रेक्षकांसोबत मनमुराद गप्पाही मारणार आहे.
         'लागीर झालं जी'या मालिकेने अबाल वृद्धांच्या काळजाचा वेध घेतला आहे. यात फौजीची भुमिका साकारणारा आज्या-शितली, जयडी-भैय्यासाहेब व राहुल्या मामी ही पात्रे सर्वांच्याच मनात घर केले आहे. झी मराठीवर ही मालिका गेली बरेच दिवस चालली असून ही मालिका जवानांमध्ये सुद्धा लोकप्रिय झालेली आहे. यातील मुख्य धाडसी,व कावेबाज व खुन्नसी भूमिका साकारणारी 'जयडी'(किरण ढाणे)ही सर्वांच्याच लक्षात राहिली आहे.
             ही अभिनेत्री सांगली जिल्ह्यातील विटा येथे येणार असल्याने तिला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. कला,क्रीडा व सांस्कृतिक व राजकीय  वारसा जपण्यात विटा या शहराचे महत्वपूर्ण योगदान आहे. अनेक रसिक, कलाकार, राजकीय नेतेमंडळीं व खेळाडू याच रांगड्या मातीत घडले आहेत. कलेवर प्रेम करणाऱ्या या शहरातील गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच आगळ्या- वेगळ्या धाटणीतल्या कार्यक्रमामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
             'सैराट 'चित्रपटात 'आर्ची 'ची भूमिका साकारणारी रिंकु राजगुरु ही यापुर्वी  एका कार्यक्रमास आली असता त्यावेळीही प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. अनेकांचे खिसे कापले गेले होते.एका ठेकेदारांची बँकेत भरणा करायला जात असताना आर्चीला पाहण्याच्या नादात  त्याच्या रक्कमेवर चोरट्यानी डल्ला मारला होता.  'जयडी'पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक यूवक,यूवतीत आनंदी आंनद असून तिला पाहण्यासाठी जाण्याच्या तयारीत अनेक तरुण गाड्या भाड्याने ठरवण्यात  व नियोजन करण्यात  व्यस्त दिसत आहेत.

 
Top