तुळजापूर : कुमार नाईकवाडी
शहरातील वासुदेव गल्ली मध्ये कल्याण नावाचा मटका जुगार खेळताना व खेळविताना पोलिसांनी बुधवार दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी छापा टाकून बुक्की मालकासह चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तुळजापूर येथील वासुदेव गल्ली येथे येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांना कमी पैशा मध्ये जास्तीत जास्त पैशाचे आमिष दाखवुन अंदाजीत येणारे अंकावर पैसेलावून कल्याण नांवाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असतांना पोलिसांनी छापा मारून दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम १हजार १२०रुपये सह एक ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व एक दुचाकी ३० हजार रुपये असे एकूण ३५हजार१२०रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पो कॉ बीबी ठाकूर यांच्या फिर्यादी वरून वसंत गोविंद दरेकर,राहुल छगन क्षीरसागर, संतोष परमेश्वर(कदम),पिंटू उर्फ श्रीकांत पांडगळे, रणजित इंगळे,आनंद जगताप, श्रीकांत मोहन रसाळ यांच्या वर मुबंई जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.