अंबाजोगाई : दत्ता खोगरे

येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालया मध्ये ‘महाविद्यालय विकास समिती'च्या नवनियुक्त सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सत्कार समारंभाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख रमेश बाबुरावजी आडसकर  यांनी सांगितले की,या महाविद्यालयाची वेगाने प्रगती होत आहे.या प्रगतीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी वर्गाचे योगदान महत्त्वाचे आहे. आपल्याकडे येणारा विद्यार्थी हा ग्रामीण  असून त्याचा विकास करणे हे ध्येय ठेवून आपण आपले कार्य करावे.सर्वांना सोबत घेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीतून महाविद्यालयाचा व म.शि.प्र.मंडळाच्या महाविद्यालयांमध्ये अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविणार असल्याचे रमेश आडसकर म्हणाले.


याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला रेड्डी गुंडरे यांनी सांगितले की,महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 97 (1) नुसार म.शि.प्र.मंडळाने महाविद्यालयाची महाविद्यालय विकास समिती गठीत केली आहे.संस्थेचे अध्यक्ष माजी मंञी प्रकाशदादा सोळंके व सरचिटणीस आमदार सतीशभाऊ चव्हाण यांनी महाविद्यालय विकास समिती नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाची प्रगती करताना सदरील समितीचे योगदान महत्वाचे असते. यासाठी ही समिती कार्य करते असे प्राचार्य डॉ.वनमाला रेड्डी गुंडरे म्हणाल्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रमेश आडसकर (चेअरमन, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना) तर विचारमंचावर म.शि.प्र.मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य दत्तात्रय पाटील,अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व सिनेट सदस्य गोविंदराव देशमुख,महाविद्यालय विकास समिती सदस्य बालासाहेब चव्हाण, प्रा.एस.के.जोगदंड (निमंत्रित सदस्य),अमर देशमुख (निमंत्रित सदस्य),रणजित लोमटे (निमंत्रित सदस्य), सय्यद पाशू करीम (निमंत्रित सदस्य), डॉ.आण्णासाहेब जाधव (निमंत्रित सदस्य),  यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अण्णासाहेब जाधव, प्रा.एस.के.जोगदंड, सय्यद पाशू करीम यांनी मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून वेळोवेळी सहकार्य होईल असे सांगितले. दत्तात्रय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे.सर्वांनी विद्यार्थी केंद्र मानून कार्य करावे. महाविद्यालयांच्या विकासामध्ये आमचे सहकार्य ज्यावेळी हवे असेल त्यावेळी आम्ही तत्परतेने करु अशी ग्वाही दत्तात्रय पाटील यांनी यावेळी दिली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कांतराव गाडे,डॉ.दिनकर तांदळे, प्रा.भगवान शिंदे,सर्व प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिलीप भिसे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा.कांतराव गाडे यांनी मानले.

 
Top