सलगरा : प्रताप मोरे

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दिवटी) येथील रहिवाशी असलेल्या सैनिक विजय बब्रुवान शिंगटे हे सेवेत असून त्यांचा पुणे येथे उपचार सुरु असताना रविवार दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दु:खद निधन झाले. 

गेल्या दहा वर्षापुर्वी  सैन्य दलात दाखल झालेले विजय शिंगटे यांना मधुमेहचा आजार झाला होता. त्यांच्यावर पुणे येथील सैनिक कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार घेत असताना त्यांची किडनी निकामी झाली. तरीही देशाची सेवा करण्यासाठी त्यांची मातोश्री तानाबाई शिंगटे यांनी आपली स्वतःची किडनी दिली. परंतु त्यानंतर ही प्रक्रृतीने साथ न दिल्याने प्रकृती खालावत जावून रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान निधन झाले.

हे वृत्त समजताच शिंगटे परिवारावर व सलगरा दिवटी पंचक्रोशीत शोककळा पसरली.  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आई,वडिल, तीन भाऊ, असा परिवार आहे. त्यांचा पार्थिवावर सलगरा (दि) येथे मंगळवार दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 
Top