नळदुर्ग :
येथील भोईराज गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त गुणवंतांचा सत्कार, व्याख्यान, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 18 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता नळदुर्ग येथील भोई गल्ली येथे महिलांसाठी फनी स्पर्धा होणार असून सायंकाळी पाच वाजता श्री गणपती अथर्वशीर्ष पठण होणार आहे. तसेच 'श्री गणेश उत्सवात करा पर्यावरणाचे रक्षण" या विषायावर कविता उकंडे यांचे व्याख्यान होणार आहे.
त्याचबरोबर 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता निवृत्त शिक्षक प्रकाश दासकर, कराटे पदक विजेता सुजित राजेंद्र दासकर, गणेश रथ भेट दिल्याबद्दल कौरव सागर सुरेश आदींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विदयार्थ्यांना पारितोषिक व विविध स्पर्धेतील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रीय पुरस्कार विजेता म्होरक्या चित्रपटाचे लेखक अमर देवकर, नळदुर्ग पेालीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, युनिटी मल्टिकॉन्स कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी, कला विज्ञान व वाणिज्य महाविदयालयाचे प्राचार्य मोहन बाबरे, तुळजाभवानी हॉटेल मॅनेजमेंट महाविदयालयाचे महेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रविवार दि. 23 सप्टेंबर रोजी पहाटे होमहवन, दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुक काढण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष आकाश पुदाले, उपाध्यक्ष आकाश डुकरे, शुभम मायाचारी, कोषाध्यक्ष संतोष पुदाले, सचिव संदीप बंदीछोडे, अक्षय सिध्दे, मिरवणूक प्रमुख सुनिल उकंडे, दिपक डुकरे, रवि सुरवसे, प्रकाश दासकर, सागर कौरव, सचिन भोई, भानुदास पुदाले आदीजण कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतले आहे.
