मंगळवेढा  : 

मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या बाप-लेकांचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव-लक्ष्मी दहीवडी कॅनॉल परिसरातील रविवार दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 

अप्पा विठ्ठल ढोबळे (वय.४५) व चैतन्य आप्पा ढोबळे (वय.१५) दोघे रा. गुंजेगाव, ता. मंगळवेढा असे शॉक लागून मृत्यू झालेल्या बाप-लेकांचे नावे आहेत. उजनी कॅनॉलला उजनी धरणातून पाणी सोडल्याने मयत आप्पा ढोबळे यांच्या शेतात ऊस लावल्याने उसाला पाणी देण्यासाठी कॅनॉलमधील मोटार चालू करण्यासाठी अप्पा ढोबळे हे गेले असता बटन दाबताना त्यांना जोराचा शॉक लागला असता त्यांचा मुलगा चैतन्य ढोबळे वडिलांना वाचविण्यासाठी गेला असता तोही शोक लागून मयत झाला आहे.
 
Top