नळदुर्ग :
तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यस्तरीय तपासणीच्या अनुषंगाने शुक्रवार रोजी पूर्व तयारी बैठक व गाव पाहणी करण्यात आली. यापूर्वी स्मार्ट आलियाबाद ग्रामपंचायतीस अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मधुकर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, तुळजापूर पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, अशोक पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

