
नळदुर्ग :
तुळजापूर येथील टाटा सामजिक संस्थेच्या विदयालयातील विद्यार्थ्यांनी शिरगापूर ता. तुळजापूर गावातून जनजागृती मशाल फेरी काढली. या फेरीमध्ये झाडे लावा झाडे जगवा , मुलगी शिकली प्रगती झाली, अस्पृश्यता नष्ट करा, बेटी बचाव, लिंग भेद, विकासाचा छेद, शिक्षण हाच मार्ग खरा अशा घोषणा देत गावातून मशाल फेरी काढण्यात आली.
यावेळी सरपंच अंकुश कदम, विनायक जाधव, पोलिस पाटील नागनाथ पाटील, धनाजी जाधव, बालाजी जाधव यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, विदयार्थी उपस्थित होते. यावेळी बालगणेश मंडळाच्या गणेशाची आरती करून गावात विना परवाना एक गाव एक गणपती असल्याचे पाहून टाटा संस्थेच्या विदयार्थ्यांनी लहान बालकांचे कौतुक केले.
याप्रसंगी टाटा सामजिक संस्थेची विदयार्थिनी सिध्दी पोळ हिने बोलताना सांगितले की, आम्ही विदयार्थी आसाम , उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यासह सातारा व उस्मानाबद येथून आलो असून शिरगापूर गावात 27 दिवस राहणार आहोत, आम्ही विविध उपक्रम राबवून कृषी महिला , ग्रामपंचायतीचे कामे, रोजगार, शिक्षण अशा विविध विषयाची माहिती जाणून घेणार असल्याचे सांगून ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी टाटा महाविद्यालयाचे विद्यार्थी सिद्धी पोळ, आदित्य बनसोडे, अनविषा पांडे, सॅनड्रा, अनिशा, आशिष यांच्यासह गावातील केशव जाधव, हरी जाधव, लक्ष्मण जाधव आदीजण उपस्थित होते .
