तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे शुक्रवार दि. 21 सप्टेंबर रोजी अमित सामाजिक संस्था व संशोधन केंद्र ताकविकी तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दंतरोग व त्वचा रोग आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य के. वाय .इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी महा विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते. या शिबिरात दंतरोग ,त्वचारोग,बल्ड शुगर, बल्ड एच बी, बीपी ,यांची तपासणी करण्यात आली. यात येत्या सहावी, नववी व अकरावी या विद्यार्थ्यांना टी टी चे इंजेक्शन देण्यात आले तसेच स्वच्छता व आपले आरोग्य या विषयावर डॉक्टर रामेश्वर यादव यांनी मार्गदर्शन केले. मुलींच्या संदर्भात असणाऱ्या आरोग्याच्या अडचणी व्हिडिओद्वारे दाखवून त्याचे निराकरण करण्यात आले. आजच्या तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन दिवसे दिवस वाढत आहे हे व्यसन आरोग्याला किती हानिकारक आहे याची माहिती देण्यात येऊन तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
या शिबिरात एकूण 396 जणांची तपासणी करण्यात आली. याकामी डॉक्टर रामेश्वर यादव ,डॉक्टर श्रीकांतकवठेकर, डॉक्टर राजेश पाटील ,डॉक्टर प्रिया पाटील, डॉक्टर अश्विनी चंदने ,डॉक्टर शरयू पालकर, डॉक्टर मिलिंद कवठेकर,डॉ. उंदरे, स्टाफ नर्स अल्का सुळ यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य इंगळे यांनी केले सूत्रसंचालन सुरेश बोरगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲडव्होकेट अमोल गुंड ,तात्या माळी, मंगेश जवळे व रामेश्वर यादव यांनी पुढाकार घेतला.
