तुळजापुर : कुमार नाईकवाडी
"माझ्या सोबत लग्न कर नाही तर तुला ठार मारुन टाकेन" अशी चिट्टी एका अठरा वर्षीय मुलीच्या घरासमोर एका टवाळखोराने टाकल्याची घटना तुळजापूर खुर्द येथे शनिवार दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिडित मुलीच्या पित्याने तुळजापूर पोलिसात तक्रार दिल्यावरुन एकाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तुळजापुर खुर्द येथील अठरा वर्षीय मुलगी व तिचा वडील घरासमोर रस्त्याने जात असताना आरोपी आखिल अनवर नदाफ रा. तुळजापुर खुर्द हा मोटार सायकलवरुन येवुन पिडीत मुलीच्या अंगावर चिट्ट्या फेकून ञास दिला व माझ्या सोबत लग्न कर नसता तुला ठार मारुन टाकेन असा मजकूर चिट्टी मध्ये लिहुन घराच्या दरवाज्या समोर टाकुन निघुन गेला. सदरील अशा घटना यापुर्वी पण मागिल एक माहिन्या पासुन आधुन मधुन सतत वरील प्रमाणे अंगावर चिठया टाकुन ञास देत होता. पिडीत मुलीच्या पित्याने फिर्याद दिल्यावरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात संबंधिताच्या विरोधात गु.र.न.296/18 कलम 354,354(ड) 506 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माने हया करीत आहे.
