उमरगा (लक्ष्मण पवार) :
लातूर - गुलबर्गा रोडवरील उमरगा चौरस्ताजवळ बिरूदेव मंदिरासमोरील हजारो निलगिरीच्या झाडांची राज्य मार्ग बनविण्यासाठी कत्तल करण्याचा सपाटा सोमवार दि. 10 रोजी दिवसभर सुरु होता.
याबाबतचा खबरनामा आसा की, राज्य महामार्ग बनविण्याच्या नावाखाली हजारो निलगिरी, लिंब, सुबाभूळ यासह विविध प्रकारचे झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात येत आहेत. कागदोपत्री नाममात्र झाडांची नोंद करीत हजारो झाडांची कत्तल दिवसाढवळ्या सुरू असल्याचे दिसून आहे.
या वृक्ष तोडीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजीक वनिकरण विभाग, तसेच वन क्षेत्रपाल विभाग. या ठिकाणच्या हजारो झाडांची तोडणी होताना ठेकेदाराचे हित जोपासण्यासाठी मुग गिळून गप्प बसल्याचे दिसत आहे.