ताज्या घडामोडी


इटकळ : भाजप विरोधी सर्व पक्षांनी इंधन दरवाढीसाठी आज भारत बंदची हाक दिली होती. परंतु बहुतांश ग्रामीण भागातुन त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

तुळजापुर तालुक्यातील इटकळ सह परीसरात सर्व व्यवहार सकाळ पासुनच सुरळीत चालू होते. परिसरामधील कोणत्याही पक्षातील लोकांनी बंदसाठी पुढाकार घेऊन त्याबाबतचे आवाहन केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवहार दिवसभर सुरु होते. पेट्रोल, डिझेल, गॅसदर वाढीमुळे होणारे परिणाम लक्षात घेऊन लोकांना जागृत करुण्यासाठी आज भारत बंद इटकळ परिसरात दिसला नाही.

 
Top