बार्शी :
पनवेल येथे पोलिसांनी कारवई करुन पकडलेल्या रेशनच्या काळ्या बाजारातील ११० टन तांदूळ पकडला. त्यानंतर बार्शी पोलिसांनीही विविध ठिकाणी छापे मारुन लाखो रुपयांचे धान्य पकडले. यबाबत शिवसेनेच्या वतीने काळा बाजार करणाèया व्यापा-यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्यास पांडे चौक येथे जोडा मारो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तहसिल आणि पोलिस प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, शहराध्यक्ष दिपक आंधळकर, राजा गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनप्रसंगी शिवसेनेच्या कार्यकत्र्यांनी गली गली में शोर है, ॠंबंधीत व्यापा-यांची नावे घेत ते चोर है च्या घोषणा देण्यात आल्या. प्रतिकात्मक पुतळ्यावर काही संशशित व्याप-यांची नावे लिहून पुतळ्यास जोड्याने मारुन निषेध व्यक्त करण्यात आला.
िदपक आंधळकर म्हणाले, हे प्रकार एकदाचे थांबले पाहिजे त्यासाठी शिवसेना आक्रमक होत आहे. सर्वसामान्य नागिरकांची पिळवण्ूक व हे प्रकार असेच सुरू राहिले तर कायदा हातात घेवून काळाबाजार करणाऱ्यांना धडा शिकवू. अन्याय झाल्यावर लाथ मारायला शिकले पाहिजे. आरोपींवर मोक्का लावला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
भाउसाहेब आंधळकर म्हणाले, पोलिस खात्याने चांगले काम केले आहे. परंतु तहसिल कार्यालय आणि महसूनच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाउन आणि संचारबंदी करून नागरिकांना जेलमध्ये ठेवले, घराबाहेर येवू दिले नाही अाणि गोरगरिबांच्या तोंडाचा घास असलेला ४ कंटेनर तांदूळ यांनी लंपास केला. पंतप्रधान मोदी साहेबांनी गोरगरिबांसाठी मोफत उपलब्ध केलेला तांदूळ काही व्यापाऱ्यांनी काळ्याबाजारात नेला त्या दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्यांना शेण खावू घालायला पाहिजे. त्यांचा बुरखा फाडण्याठी हे आंदोलन केले आहे. एवढा मोठा काळाबाजार होत असतांना प्रशासन, तहसिलदार काय करत आहे, प्रांताधिकारी काय करत आहे, हे पोलिसांचे काम नाही. पुरवठा निरीक्षक यात सामील आहे, जे राजकिय व्यक्तींचे संचालक मंडळ आहे ते तात्काळ बरखास्त करून, आरोपींवर मोक्कालावून त्याचा तपास सीआयडीकडे दिला पाहिजे. ११० टन जप्त तांदूळ न्यायालयाची परवानगी घेवून गोरगरिबांना दिला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगीतले.