नळदुर्ग, दि. 18 : येथील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी विविध मागण्यासांठी काळ्या फिती लावून नगरपरिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी कर्मचा-यांनी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांना याबाबतचे निवेदन दिले. 

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन १००% कोषागार मार्फत करण्यात यावे,  सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तात्काळ रोखीने देण्यात यावा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना विनाअट सेवेत कायम करण्यात यावे, सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती व वरिष्ठ श्रेणी लागू करावी, 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यासाठी नळदुर्ग नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.

या उपोषणामध्ये कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक कांबळे, उपाध्यक्ष मुनीर शेख, सचिव फरमान पठाण, कार्याध्यक्ष लक्ष्मण कुंभार, खलील शेख, अजय काकडे, सुरज गायकवाड, नवनाथ होनराव, राजू रोमन, भाऊसाहेब फुंड, मुश्ताक पटेल, राजाभाऊ सुतार, सुशांत डुकरे, ज्योती बचाटे, तानाजी गायकवाड, सतीश आकाडे, फुलचंद सुरवसे, भीमसेन भोसले, नितीन पवार, प्रवीण चव्हाण, सुशांत भालेराव, राणुबाई सपकाळ, मयुरी जाधव आदीजण सहभागी झाले होते.

 
Top