बार्शी, दि 15 : स्वातंत्र दिना निमित्ताने येथील प्रगती विद्या मंदिर येथे इनरव्हील क्लब ऑफ बार्शी यांनी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून कोरोना वाँरियरस, शिक्षण, समाजसेवक, सर्पमित्र, वृक्ष संवर्धन, धान्यकिट वाटप, जेवणाचे डब्बे घरोघरी पोहोचवणारे, कोरोना लॉकडाऊनच्या काळात निस्वार्थीपणे समाज सेवा करणारे नितेश बोकेफोडे, राहुल वाणी, सुमित खुरंगळे, योगेश घंटे, अक्षय घोडके, मनोज पवार, अभय सरकाळे, धनाजी फावडे या समाजसेवकांचा  सेवा पुरस्कार देऊन  गौरव करण्यात आला. 

इनर व्हील क्लब ऑफ बार्शी व प्रगती विद्या मंदिर शिक्षक वृंद तसेच श्री गणेश प्लास्टीक फँक्टरीचे सर्व कामगार मित्र व सुमित खुरंगळे यांनी आमच्या निःस्वार्थ समाजिक कामाची दखल घेतली. त्याबद्दल त्यांचे  विषेश आभार मानूर समाजसेवा कार्य करण्यासाठी उर्जा दुप्पट झाली व प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


 
Top