बार्शी, दि. 15 : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बार्शी तालूका कौन्सिलच्या वतिने आज दि. 15 ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण मंडळाने कम्युनिस्ट पक्षाचे काॅम्रेड भारत भोसले यांच्या हस्ते ध्वज फडकवला व ध्वजाला सलामी देवून राष्ट्र गित गाण्यात आले.
यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यत्यांनी संविधान रक्षणाची शपथ घेतली, यामध्ये भारतीय संविधानाचे रक्षण हेच लोकशाहीचे बळकटीकरण करणे, केंद्र सरकार पुरस्कृत धर्मवादी राजकारण, सार्वजनिक उद्योगांचे व कंपन्या चे खाजगीकरण याचा निषेध व विरोध करणे, देशात धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, मानवता ही लोकशाही मूल्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न करने, मूल्यांच्या पायमल्ली करणार्या शक्तीशी सामुदायिकपणे प्रतिकार करणे, देशातील मुस्लिम अल्पसंख्यांक, दलित, शोषित घटकाला लक्ष बनवण्यार्या प्रवृत्तीचा धिक्कार करून विरोध करणे, एककल्लीपणे, वागणार्या हुकूमशाही शक्तींना विरोध करणे, न्यायव्यवस्था, सीबीआय, एईडी, निवडणूक आयोग यामध्ये सरकारच्या हस्तक्षेपाचा व दबावतंत्राचा धिक्कार व विरोध करणे, भारताचे सार्वभौम, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, गणराज्यासाठी सदैव कटिबद्ध राहूण, साम्राज्यवादी शक्तीपुढे झुकण्याच्या सरकारच्या विदेश नितीला विरोध म्हणजे देशाचा विरोध या लोकशाही विरोधी भूमिकेचा निषेध, तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणा विरुद्ध लढणार्या बुद्धिजीवी नेते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणार्या त्यांना तुरुंगात डांबण्याच्या हुकुमशाही पद्धतीचा निषेध व्यक्त करत भारतीय राज्यघटनेवर केल्या जाणार्या हल्ल्याचा, नागरिकांच्या लोकशाही हक्काचा, नागरी स्वातंत्यावर होणार्या हल्ल्याचा निषेध करत संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेतली.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव काॅम्रेड प्रविण मस्तुद, काॅम्रेड अनिरूध्द नखाते, वरद नखाते, शुभक शिंदे, आंनद धोत्रे, बानपा कर्मचारी नागेश अवघडे, कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक दिपक गुळवे, राहूल ओहाळ, गायत्री पाटील, उमा तांबे हे उपस्थित होते.