वागदरी : एस.के. गायकवाड
कोरोनाच्या सावटाखाली तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे विविध ठिकाणी पंधरा आँँगस्ट स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी म्हणून देशभरात लागु केलेल्या संचार बंदीचे व फिजिकल अंतराचे पालन करत येथील जि.प.प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका महादेवी जते यांच्या हस्ते, तर येथील ग्रा.प.कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या हस्ते व येथील व्यसनमुक्तीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे श्रीशैल्य मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या प्रांगणात पत्रकार किशोर धुमाळ,रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपसरपंच दत्ता सुरवसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, ग्रा.प.सदस्य महादेव बिराजदार,रावसाहेब वाघमारे,विद्या बिरादार, मंदिराचे पुजारी श्रीशैल्य सुरेश महाराज, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष लक्ष्मी चिलगुंडे,उपाध्यक्ष सविता पाटील, सर्व शिक्षक वर्ग, युवा कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी दिवंगत शांताबाई बिराजदार पाटील यांच्या स्मरणार्थ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गजेंद्र पाटील यांनी सानिटायझरचे वाटप केले.