सोलापूर : सुनिल कोडगी
देशभरात १५ सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिवस’ (इंजिनिअर्स डे) म्हणून साजरा केला जातो. भारतातील पहिले अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ अभियंता दिवस साजरा केला जातो. श्री सिध्देश्वर महिला तंत्रनिकेतन मधिल श्री कर्मयोगी आप्पासाहेब काडादी व श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जन्म़दिनाचे औचित्य़ साधून इंजिनिअर्स डे १५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.
फक्त मार्काष्ठित न राहता एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहण्यास शिकले पाहिजे. आपल्यातील कौशल्य ओळखून त्यामध्ये पारंगत घेऊन स्वतःची प्रगती करावे. आपल्या शहरात राहून परदेशातील लोकांसोबत आपण काम करू शकतो. पुढिल सहा महिन्यात कॉम्प्युटर व आय टी विभागातील विद्यार्थ्यासाठी अनेक नोकरीची संधी आय टी हबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. असे प्रतिपादन अमोल कटारे आपल्या भाषणात बोलत होते.
या प्रसंगी अमोल कटारे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बी. नाडगौडा, सचिव आर एस पाटिल, प्राचार्य गजानन धरणे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बी. नाडगौडा यांनी इंजिनिअरकडे सृजनशीलता, एखादया गोष्टीचे विचार करण्याची क्षमता असते. भारत महासत्ता होण्यासाठी इंजिनिअरचे योगदान फार महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर आपल्या कल्पना शक्तीला वाव दिला पाहिजे. विविध क्षेत्रातील आव्हान स्वीकारले तर तुमच्या स्वप्नापूर्तीकडे वाटचाल करू शकाल असे आपल्या भाषणात म्हणाले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे या प्रसंगी बोलताना म्हणाले की, इंजिनीअर हा सामाजिक सेवा करणारा व समाजाचा विकास करणारा असतो. इंजिनिअर हा भारताचा भावी सुजाण नागरिक आहे. असे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या व कै. आप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त आयोजनपर कार्यक्रमात ते बोलत होते.
अभियंता दिनानिमित्त इलेक्ट्रानिक्स़ अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे प्रोजेक्ट प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच सिव्हिल विभागातर्फे मॉडेल मेकिंग, कॉम्प्युटर व आयटी विभागातर्फे पोस्टर प्रेझेंटेशन, इलेक्ट्रिकल विभागातर्फे क्वीज आणि पोस्टर या स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनामध्ये जवळपास ३० ग्रुप सहभागी झाले होते. १०० विदयार्थीनींनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी मेणकुदळे व आभारप्रदर्शन निलोफर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुचेता चौधरी, प्राजक्ता अभ्यंकर, अश्विनी कुंभार, सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थिनी व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
