तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :-
तालुक्यातील काक्रंबा येथील संत मुक्ताबाई महिला भजनी मंडळाच्या वतीने शुक्रवार दि. ७ सप्टेंबर रोजी संत सेना महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुक्ताबाई महिला भजनी मंडळाच्या वतीने संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचन पूजन करून अभिवादन करण्यात आल्यानंतर महिलांनी भजन केले. यावेळी सुनिता मोहिते, चतुरा आलमले, सुलन क्षिरसागर, छाया मोहिते, जनाबाई क्षिरसागर, पुतळाबाई मदने, धोडांबाई ठेले, विजयमाला क्षिरसागर, शोभा राऊत, मंदाकिनी वाघमारे, सुमन राऊत, आवडाबाई म्हेञे, छाया दळवे, शकुंतला हांडे, सहदेव जगताप, बापूराव जाधव, बब्रुवान मोहिते, ज्ञानेश्वर म्हेञे, संगिता कुरनुरकर आदीसह ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.