तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-
अर्था शिवाय जीवनाला कांही अर्थ नाही त्यांमुळे युवक युवतीनी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन उद्योग व्यवसाय करावेत व आपला आर्थिक स्तर उंचवावा असे आव्हान आर एस इ टी आय उस्मानाबाद चे प्रशिक्षक विकास गोफणे यांनी केले.
नेहरू युवा केद्रं उस्मानाबाद मार्फत शुक्रवार दि. ७ सप्टेंबर रोजी तुळजापुर सामाजिक ऐक्य पंधरवडा व कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी प्रशिक्षणार्थाना मार्गदर्शन करताना गोफणे हे बोलत होते. या प्रसंगी माजी सैनिक सुधाकर पवार, नायब तहसीलदार श्रीमती एन आर सुर्यवंशी, नेहरु युवा केद्रां चे रामचंद्र कुलकर्णी, नगर सेवक सुनील रोचकरी, भा.ज.पा.जिल्हा उपाध्यक्षा मिनाताई सोमाजी उपस्थिती होत्या.
पुढे बोलताना गोफणे म्हणाले की, शिक्षणा बरोबर प्रशिक्षणाची युवंकाना नितांत गरज आहे एस.बी.आय.कडुन उस्मानाबाद येथे १८ते ४५ वयोगटातील ग्रामीन युवक, युवतीना मोफत निवासी व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण वर्षभर सुरु असते ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणाना समोर ठेवुन शासनाने हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केलेला असुन या मध्ये 25 प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते जास्तीत जास्त ग्रामीण युवक ,युवतीनी याचा लाभ घ्यावा व्यवसाय उद्योग केल्याशिवाय आपणास पर्याय उरलेला नाही चांगल्या दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण घ्या व चांगले उद्योजक बना समाजाला चांगली सेवा देणाऱ्या व्यवसायीकांची व उद्योजकाची गरज आहे.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन मृनाली भांजी यांनी केले तर आभार सौ सुर्वना उमाप यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेरणा पथ संस्थेच्या सौ संध्या खुरुद ,रुपाली घाडगे ज्योती घाडगे लता सोमाजी अंबिका भिसे अरुणा कावरे श्री देवी वेदपाठक कोमल घुगे आदीनी परिश्रम घेतले.