तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-
पावसाळा सुरुवात होवुन तब्बल दोन ते तीन माहिने लोटले या माहिन्या अखेरीस पाऊस परतीच्या वाटेवर राहील असे असताना अद्याप पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा शेतकरी संकटात सापडला. तुळजापुर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही त्यामुळे अनेक धरने नंदी नाले कोरडेठाक आहेत या पार्श्वभूमीवर यंदाच्या पोळा सणाला सर्जा, राजा च्या आंघोळीची पंचायत झाल्याचे चिञ निर्माण झाल्याचे दिसत आहे.
मागील आठवड्यात रिमझिम पाऊसाने पिके तरारली असली तरी उत्पादनात मोठी घट होणार असल्याने बळीराजा शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे मृग नक्षत्राच्या तोंडावर पाहिल्याच पाऊस दणक्याचा झाला त्यामुळे भोळ्या,भाबड्या कष्टकरी शेतकऱ्याने त्या अंदाजावर विश्वास ठेवत मागच्या वर्षी च दुःख विसरुन पुन्हा जोमाने पेरनी केली माञ पाऊसांने उघडीप दिल्याने बळीराजा शेतकरी संकटात सापडला आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी पोळ्याचा सण आहे त्यांची खांदी मळणी करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्याकडे उभा राहिला आहे."धाव रे धाव पाऊसा" असा साद शेतकरी घालीत आहेत..