तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :- 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव अशोक गहलोत यांनी सरकार विरोधात 10 सप्टेंबर 2018 रोजी भारत बंद पुकारलेला आहे. देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचे झपाटयाने होणारी दरवाढ हा सर्वसामान्य जनतेसमोरील प्रमुख व अंत्यत महत्वाचा प्रश्न आहे.तसेच रुपयाचे सतत होणारे अवमुल्यन, राफेल खरेदी करार या मुदयासह विविध प्रश्नावर झोपेचे सोंग घेतलेल्या भाजपा सरकारला जागे करण्यासाठी देशभरात बंद पुकारुन आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी या बंदमध्ये तुळजापूर तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष व संघटनानी सामील होण्याचे आवाहन काँग्रेसचे तुळजापूर तालुकाध्यक्ष अमर मगर यांनी केले आहे.
तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार यांना आमदार मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, युवा नेते सुनिल चव्हाण, तालुका अध्यक्ष अमर मगर, सभापती शिवाजी गायकवाड तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व सदस्य व काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, काँग्रेस पक्षाचे सर्व सरपंच यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात येणार आहे.

तरी सर्व समविचारी पक्ष व संघटनानी सहभाग घेवून बंद पाळण्यात यावा. केंद्र सरकार दररोजच पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ करित आहे. ती त्वरीत थांबवून जनतेला दिलासा दयावा यासाठी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते,समविचारी पक्ष,सामाजिक संघटना यांनी हि भारत बंद मध्ये सामील व्हावे,असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमर यांनी केले आहे.

 
Top