खानापुर : बालाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील खानापुर येथे स्वछता हि जनसेवा या व्यापक जनजागृती अभियानाअंतर्गत  ग्रामपंचायत कार्यालय खानापुर व जि. प.शाळा यांच्या वतीने गावातील परिसर स्वच्छ करण्यात आला.

यावेळी ग्रामसेविका घुले एस.ए व मुख्याध्यापक बशेट्टी सर,यांनी विद्यर्थ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली व आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देऊन स्वच्छता विषयी सवयी अंगिकरून स्वच्छता विषयक सवयींमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर  स्वच्छता  शपथ देण्यात आली.व सर्वांच्या श्रमदानातून शाळेचा परिसर व रस्ते  स्वच्छ करण्यात आले.

या श्रमदानामध्ये  सरपंच उत्तम धुते, ग्रामसेविका घुले एस.ए, मुख्याध्यापक बनशेट्टी सर,शालेय समितीचे अध्यक्ष इब्राहिम पटेल, सहशिक्षक घोडके, पवार मॅडम, पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती माधवी पाटील, बालाजी गायकवाड, अप्पा कांबळे,  यांच्यासह विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.

 
Top