तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या मार्गदर्शनानुसार पंडीत दीनदयाळ ऊपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शनपर मनोगतात प्रा.डॉ. शिवाजीराव देशमुख म्हणाले की, पंडीत दीनदयाळ ऊपाध्याय यांचे व्यक्तीमत्व साधी राहणी व ऊच्च विचारसरणी असेच होते.शास्ञे,धार्मिक क ग्रंथ व तात्विक ग्रंथाच्या चिंतनातुन त्यांनी एकात्ममानववाद हा सिद्धांत समाजासमोर मांडला .आजच्या तरुण पिढीने त्यांच्या वैचारिक व्यक्तिमत्त्वाचा आदर्श अभ्यासण्याची गरज त्यांनी या वेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आभार प्रा.विवेकानंद चव्हाण यांनी मानले. तसेच या प्रसंगी प्रा.डॉ. एस.बी.शेतसंदी, प्रा.डॉ. वाय.ए.डोके, प्रा.डॉ. टि.एल. बारबोले, प्रा. एच.वाय. साळुंखे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
