तुळजापुर : कुमार नाईकवाडी
वृतपञ विक्रेत्यांच्या असंघटित कामगार म्हणून राज्यभर नोंदण्या सुरु करुन कल्याणकारी मंडळाची अमंलबजावणी करण्यात यावी, अशा अशायाचे एक लेखी निवेदन तुळजापुर शहरातील वृत पञ संघटनेच्या वतीने दि.२५ मंगळवार रोजी येथील नायब तहसीलदार यांना देण्यात आले.
वृत पञ संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, यापुर्वी वृत पञ संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना दि.७/९/२०१८ रोजी एक निवेदन पञ देण्यात आले होते. त्यामध्ये असे म्हंटले होते की, महाराष्ट्र राज्य वृतपञ विक्रेता संघटना गेल्या १२ ते १३ वर्षापासुन राज्यातील वृतपञ विक्रेत्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे यासाठी सतत पाठपुरावा करीत आहे. शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ न करता सर्व असंघटित कामगारासाठी महाराष्ट्र असंघटित कामगार सुरक्षा मंडळाची घोषणा केली आहे. नागपुर येथे दि.१६ जुलै २०१८ रोजी कामगार मंञी संभाजी पाटील यांना राज्यसंघटनेचे शिष्ट मंडळ भेटले. तेव्हा आपल्या मागण्या संदर्भात लवकरच विचार केला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले होते. वारंवार पाठपुरावा करुन सुद्धा आमंच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे तरी मा.मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
असंघटित कामगार म्हणून राज्यातील वृतपञ विक्रेत्यांच्या नोदंण्या तात्काळ सुरु कराव्यात, या सुरक्षा मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा तात्काळ देण्यात येवून मंडळ प्रत्यक्षात कार्यरत करावे, असघंटित कामगार वृतपञ विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव आर्थिक तरतुद करण्यात यावी, महाराष्ट्र राज्य असंघटित सुरक्षा मंडळात वृतपञ विक्रेत्यासाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ गठीत करावे.गटई कामगारा प्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टाँलसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी.तसेच शाषकीय घरकुल योजनेत वृतपञ विक्रेत्यासाठी राखीव कोठा ठेवण्यात यावा, अशा विविध मागण्या संदर्भात शाषनाकडे वारंवार निवेदन देवुनही दखल घेतली जात नाही तरी आमंच्या वृतपञ संघटनेच्या मागण्या त्वरीत मंजूर कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुरज बागल, उपाध्यक्ष नितीन गायकवाड , सचिव गणेश भातुसे, दिपक माळी, गणेश गायकवाड ,संजय गायकवाड ,दादासाहेब नन्नवरे आदीसह पञकार अजित चंदनशिवे, प्रदीप अमृतराव, संजय खुरुद आदीच्या स्वाक्षरी आहेत.
