तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील सह शिक्षिका  रेखा गोरे सुरवसे यांना तालुकास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे. 

शिक्षण विभागा च्या वतीने शैक्षणिक सामाजिक व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रति वर्षाला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जातो तालुक्यातील काक्रंबा येथील रहिवाशी व सध्या सांगवी मा जिल्हा परिषद शाळेतील सह शिक्षिका रेखा अरविंद गोरे सुरवसे यांना सन २०१८-१९ चा जि.प शिक्षण विभागाने आदर्श पुरस्काराने  प्रशस्तीपञ देऊन नुकताचे आ,मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले .यावेळी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष आपासाहेब पाटील,सभापती शिवाजी गायकवाड ,जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण ,पं.स.सदस्य शिवाजी गोरे,आदीसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. त्यांच्या या यशाबदल त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे .

एकल शिक्षक संघटनेच्या वतीने गोरे यांचा सत्कार

रेखा गोरे यांना यंदा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्या बदल एकल शिक्षक संघटनेच्या वतीने रेखा गोरे यांचा जिल्हा अध्यक्ष पवन सुर्यवशी ,पुष्पलता करडे,दिपक घोडके,कोंडीबा वानोळे,एन.एस.मोरे,आदी हजर होते.

 
Top