तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :- 

भाजपाचे युवा नेते रोहन देशमुख यांनी आगामी होणा-या निवडणुकीसाठी तुळजापूर विधानसभा मतदार संघात गाठीभेटी देण्यास सुरुवात केली असून  रोहन देशमुख यांच्या भेटी दौरामुळे २o१९ मध्ये होणारा विधानसभा निवडणुकीत रंगत येणार आहे.

दि. ७ सप्टेंबर शुक्रवार रोजी भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी तुळजापूर तालुक्यात दौरा केला असुन या दौरात केंद्र व राज्यात पक्षाने केलेल्या विकास कामे व अनेक योजना जनते पर्यंत पोहोचले का नाही.या करिता ग्रामीण भागातील जनतसी संवाद साधला सकाळी ८ सांगवी(मार्डी) येथे उपसरपंच जयंत बागल यानी देशमुख यांचा सत्कार केला. या शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष  अमोल बागल उपस्थित होते. १० वा सारोळा येथे येथील सरपंच मुकूंद पवार तसेच गावकरी याचा बरोबर चर्चा केली. व गावकराचा समस्याची विचार पुस केले. त्यानंतर ११ वा. सिंदफळ येते बैठक घेऊन ग्रामीण भागातील योजना बाबत महिती दिली.या वेळेस अर्जुन कापसे, शंशीकात कापसे अनेक युवक उपस्थित होते. दुपारी २ वा.आपसिंगा व कामठा येथे कार्यकर्ते व गावकरी याच्या बरोबर वार्तालाभ करून येणारा विधानसभेसाठी तुळजापूर मतदार संघात भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले तर लढण्याची तयार आहे, असे संकेत दिले.या वेळेस सरपंच संभाजी जमदाडे,उपसरपंच इरफान हसन पं.स.सदस्य शरद जमदाडे,महादेव मस्के.आदिसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शनिवार दि. ८ सप्टेंबर  रोजी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे रोहन देशमुख यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्जवल योजने अंतर्गत सावरगाव येथील सौ.काजल बालाजी लडके,दुर्गा शिवाजी लडके या लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आला. असे दहा लाभार्थ्यांना यावेळी गॅस देण्यात आले. तसेच या वेळेस प्रगतशील शेतकरी जगन्नाथ काडगावकर व आप्पासाहेब बंडगर यांच्या देशमुख याचा हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार केला. या वेळेस सरपंच आदेश कोळी प.स.सदस्य भिमराव कोळी उपस्थित होते. रोहन देशमुख यांनी मोदी सरकारने अनेक योजना महिलांन साठी राबविला जात आहेत. महिला वर्गांना चुल मुक्त करण्यासाठी गॅसचे वाटप केले जात आहेत.

 
Top