तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-
येणाऱ्या शारदीय नवराञ महोत्सवामध्ये एस.टी.महामंडळाच्या बसच्या ज्यादा गाड्यास शालेय विद्यार्थ्यांचा एस.टी.पास मान्य करावा, अशा आशयाचे एक लेखी निवेदन स्वाभीमानी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शनिवार दि. ८ सप्टेंबर रोजी येथील तुळजापुर आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांच्या मार्फत परिवहन मंञी दिवाकर रावते यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, येणाऱ्या शारदीय नवराञ महोत्सवात याञे निम्मीत जादा बस गाड्या सोडण्यात येतात. परंतु तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा एस.टी.पास घेतला जात नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्याच बरोबर नवराञ महोत्सवात विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा असतात. अशा वेळी ज्यादा बस गाड्या विद्यार्थ्यांसाठी थांबत नाहीत तसेच त्याच्यांकडे असणाऱ्या पास ला एस.टी.महामंडळ किंमत देत नाहीत तरी आमंच्या शालेय विद्यार्थ्यांचा एस टी.महामंडळानी विचार करावा शालेय विद्यार्थ्यांना पास वरती सोडण्यात यावे त्याचबरोबर तालुक्यातील सर्वञ ग्रामीण भागात एस टी.बस ची सुविधा देण्यात यावी या निवेदनावर स्वाभीमानी विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष रोहीत चव्हाण आदीसह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी आहेत.