पुणे :- सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद व लातूर-गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गासह उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भात विविध विकासाबाबत चर्चा करुन रेल्वेच्या विविध योजना, विकासकामे, तसेच रेल्वेसंबंधित विविध विषयावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, नवीन मार्ग तसेच विधुतीकरणाच्या कामावर अधिक लक्ष देण्याची सूचना खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांनी केली. 

शुक्रवार दि. 7 सप्टेंबर रोजी पुणे येथे पार पाडलेल्या लोकसभा सदस्यांच्या बैठकीत खा. रविंद्र गायकवाड यांनी रेल्वे मार्गाबाबत चर्चा केली. लातूर-गुलबर्गा या नवीन रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामास तात्काळ निधी उपलब्ध करून देणे, सोलापूर -तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गास पिंकबुक सन २०१८-१९ समाविष्ट केले आहे या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाची पुढील कार्यवाही तात्काळ सुरु करणे, कळंब रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाश्यांची अनेक दिवसापासुनची असलेली मागणी कळंब रेल्वे स्टेशनचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण करणे व एक्सप्रेक्स गाडयांना थांबा देणे, कोल्हापूर-नागपूर व्हाया उस्मानाबाद मार्गे जाणारी रेल्वे व हैद्राबाद -पुणे हि रेल्वे नियमित चालू   करणे, उस्मानाबाद - लातूर रेल्वे लाईन वरील रेल्वे स्टेशन जवळील तेर ते ढोराळा या रस्त्याचे मजबुतीकरण करणे किंवा गेट नं.३८ चालू करणे, बिदर-मुंबई गाडी नं.२२१४४ व लातूर गाडी नं.२२१०८ या गाडयांना कोटा व बोगी वाढून देणे, उस्मानाबाद रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाश्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वेचे विविध विकास कामे तात्काळ पूर्ण करणे, यासह अनेक प्रकारचे महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित करून हे लवकरात लवकर काम पूर्ण करावेत. 

या बैठकीस खा.शिवाजी आढळराव पाटील , खा.श्रीरंग बारणे, खा.विजय सिह मोहिते पाटील , खा.अनिल शिरोळे, राज्य सभा खा.सौ.वंदना चव्हाण, खा.सदाशिवरावजी  लोखंडे, खासदार  उदयनराजे भोसले,खा.धनंजय महाडिक,खा.संजय पाटील यांच्यासह  पुणे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.डी.के.शर्मा, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, मध्य रेल्वे सोलापूरचे प्रबंधक श्री.हितेंद्र मल्होत्रा, यांच्यासह मध्य रेल्वेचे संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित  होते.

 
Top