![]() |
संग्रहित छायाचित्र |
तुळजापूर :- शहरातील भोला हॉटेल जवळ मुबंई नावाचा मटका जुगार खेळताना व खेळविताना पोलिसांनी छापा टाकून दोघास शुक्रवार दि.७ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले असुन त्यांच्या ताब्यातील जुगार साहित्य सह रोख २हजार९७०रुपये जप्त करण्यात आले आहेत.
तुळजापूर येथील अमोल शंकर इंगळे,पिंटू उर्फ श्रीकांत पांडगळे हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जास्त पैशाचे आमिष दाखवून अंदाजित येणाऱ्या अंकावर पैसे लावून मुंबई मटका जुगार खेळत व खेळवित असताना भोला हॉटेल जवळ मिळून आले असून त्यांचा ताब्यातील मटका जुगार साहित्यासह २हजार९७०जप्त करून रवी भागवत यांच्या फिर्यादी वरून अमोल इंगळे,पिंटू उर्फ श्रीकांत पांडगळे यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.