तुळजापूर :- तुळजापूर येथील मातंग नगर येथील आप्पा दिगंबर कांबळे हा विनापास परवाना बेकायदेशीर १ हजार ५६० रुपयेची गावठी दारू हातभट्टी कब्जात बाळगून विक्री करत असताना पोलीस व पंचाची चाहूल लागताच पळून गेला असून पोलीस ठाण्यात शुक्रवार दि.७ सप्टेंबर रोजी रात्री ६.४५ पो ना सुहास सोनके यांच्या फिर्यादी वरून आप्पा कांबळे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.