तुळजापूर :- तालुक्यातील दिपक नगर तांडा येथे आठ वर्षीय मुलास मारहाण करून जखमी करून , मुलाच्या वडिलास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवार दि.७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली असुन पोलीस ठाण्यात तीन जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक नगर तांडा येथील दत्ता बाळू राठोड याचा मुलगा आदर्श वय ८ वर्षे हा शांताबाई सिद्राम राठोड,शीलाबाई तुकाराम राठोड,रवी सिद्राम राठोड रा.तिघे दीपक नगर तांडा यांच्या घरासमोर खेळत असताना सळईन डावे डोळ्यांची बाजूस मारून जखमी केले दत्ता राठोड यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दत्ता राठोड यांच्या फिर्यादी वरून शांताबाई सिद्राम राठोड,शीलाबाई तुकाराम राठोड,रवी सिद्राम राठोड रा.तिघे दीपक नगर तांडा यांच्या वर  २४,५०६,३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Top