उस्मानाबाद :- चिखली ता. उस्मानाबाद येथे स्वातंत्र्य सेनानी कै. भानुदासराव जयवंतराव धुरगुडे सेवा भावी संस्था मंगरूळ यांच्या वतीने शनिवार दि. 8 सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाली. या शिबीराचे उदघाटन  जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.  

या मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये मोफत चष्मे , मोफत शस्त्रक्रिया व उपस्थित रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले. यावेळी  355 ग्रामस्थांची मोफत तपासणी करुन यातील 290 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर तपासणी नंतर 40 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे उपस्थित डॉ. इसाके यांनी सांगितले. 



यावेळी ग्रामस्थांशी लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी संवाद साधून आपल्या ज्या काही अडचणी असतील , काही कामे असतील माझ्याशी संपर्क साधावा अशी उपस्थित ग्रामस्थांना विनंती केली. याप्रसंगी चिखली ग्रामस्थांच्या वतीने  महेंद्र धुरगुडे यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी माजी पं.स. सदस्य नागनाथ आप्पा पवार ,चिखली वि. वि. सो. चेअरमन उञ्येश्वर सुरवसे, माजी सरपंच देविदास जाधव, ग्रा. पं. सदस्य मार्तंड भोजने, दुष्यंत चोबे, तेजस सुरवसे , राजाभाऊ जाधव, व्यंकट साळुंखे, गणपती मुळे, अच्युत सावंत, श्रीराम पाटील, बालाजी जाधव, भागवत पोंदे, जयराम चोंबे, बापु जावळे, युवराज चोबे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top