तुळजापूर :
शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी व भावसार समाजाचे जेष्ठ सदस्य सुय॔कांत (आण्णा) पंडीतराव हिंबारे वय 66 वर्षे यांचे शनिवार दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी सोलापूर येथील अश्विनी रूग्णालय येथे अल्पाशा आजाराने दुखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, सुन व नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर येथील घाटशिळ रोड स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळेस समाज बांधव, व्यापारी वर्ग उपस्थित होते.
