काटी : उमाजी गायकवाड 

तुळजापूर  तालुक्यातील काटी, सावरगाव व तामलवाडी  येथे  गणेशोत्सव  व मोहरम सणाच्या पाश्वभूमीवर तामलवाडी पोलीस  यंत्रणा  कमालीची  सतर्क झाली  असून शनिवार  दि. 15 सप्टेंबर रोजी  सकाळी  तामलवाडी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  अशोक  चौरे व पठाण यांच्या नेतृत्वाखाली 25 पोलीस  कर्मचारी व  5 होमगार्डच्या पथकाने  गावातील  प्रमुख गणेश  विसर्जन मिरवणूक  मार्गावरुन  पथ संचलन केले. 


तुळजापूर तालुक्यातील काटी, सावरगाव व तामलवाडी परिसरासह सह अन्य गावानी गणेशोत्सव  व मोहरम हे  धार्मिक उत्सव शांततेत साजरे करावेत असे आवाहन सपोनि अशोक  चौरे यांनी केले. तसेच  तामलवाडी  पोलीस ठाण्या अंतर्गत 27 गावातील  पोलीस पाटील, तंटामुक्त ग्राम समिती, सर्व प्रमुखांनी पुढाकार  घेऊन  सर्वानी सामाजिक सौदार्या,   गावातील एकोपा, समभाव, सदाचार, आणि बंधु प्रेम परंपरा पुढे ही सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न  करण्याचे  आवाहन केले.

व्हिडिओ पहा -



 
Top