सांगली : राजेश पाटील
तृतीय पंथी असलो म्हणून काय झाले? जगण्याचा हक्क आम्हांलाही आहे. समाजात जो पर्यंत पुरुषी मानसिकता बदलत नाही तो पर्यंत महिलांवर अत्याचार होतच राहणार. तुम्ही आम्हांला दयेची भिक अन सहानुभुती दाखवू नका तर जगण्यासाठी समानता द्या असे कवयिञी साहित्यिक शब्दवेडी दिशा उर्फ दिशा केने-शेख यांनी स्त्री-पुरुष समानता, लैंगिक प्रजजन व आरोग्य हक्क ग्रामीण पत्रकार सन्मान कार्यक्रमात बोलताना सांगितले.
पुणे येथील गांजवे चौक मधील पत्रकार भवन मध्ये 'सम्यक,सावित्रीबाई फुले विद्यापीठ, रानडे इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे (फिरस्ती) हे होते. या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख संज्ञापन व वृत्त विभाग डॉ. उज्वला बर्वे, ज्येष्ठ स्त्री वादी नेत्या रझिया पटेल, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र प्राध्यापक डॉ.स्वाती देहाडराय, प्राध्यापक स्नेहा गोळे, प्रा.योगेश बोराटे,डॉ.आनंद पवार,शिरीष वाघमारे,मुक्ती साधना,प्रज्ञा मोळावडे,संदीप आखाडे,भारत करळे आदी उपस्थित होते. पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत प्रणिती नरके,गिरीश परदेशी,एबीपी च्या मुंबई प्रतिनिधी मनुश्री पाठक,यांनी ग्रामीण भागातील पत्रकारिता संधी आणि आव्हाने,भाषेचा वापर संवेदनशील पणे करण्याबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामीण साहित्यिक कवयित्री दिशा शेख यांनी मात्र सर्वानाच मंत्रमुग्ध केले.तृतीय समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व आजच्या तरुणाईची आवडती कवयित्री, दिशा शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना उपस्थितांना हेलावून सोडले.'समानता आली पण समाजातील शस्त्र आणि अस्त्र असणाऱ्या शब्दांचे वार आजही अनेकांना घायाळ करून सोडत आहेत.लेखणी ही दुधारी तलवार असली तरि समाजप्रबोधनासाठी तिचा वापर किती कृतीशील व गांभीर्याने, झाला पाहिजे,याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.दिशा शेख यांनी सादर केलेल्या कवितेने सर्वांचयाच हृदयाचा ठाव घेतला.
न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला असला तरी समाज किती अशा माणसाकडे औदार्य पूर्वक बघणार ?त्यांनी तो,ती,गे ही संबोधने न लावता एक माणूस या चौकटीत त्या तराजूत तोळण्याची गरज असल्याची बाब अधोरेखित झाली.समाजात आजही बुरसटलेल्या रूढी,परंपरा, चालीरीती या चौकटीचे खांद्यावरील जोखड झुगारून देऊन प्रत्येकांनीच समान न्याय समान वागणूक यासाठी 'सम्यक'साधण्याची गरज आहे.समाजात बदलाची फक्त ठिणगी पडू द्या तिचे रूपांतर परिवर्तनाच्या भडक्यात झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी समाजाने पत्रकाराने प्रयत्न, उठाव करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
आज सर्वच बाबतीत समानता आली पण स्त्री म्हणून जगणारे माणूस किती समान आहे,त्याला मिळणारी वागणूक,संधी समान आहे,याचा विचार करण्याची गरज आहे.
संधी समान दिली म्हणून विकासापर्यंत सर्वच जण पोहोचतील असे नाही.या विकासापर्यंत एक विशिष्ट असा सक्षम असणारा वर्गच पोहोचू शकेल की ज्याच्यात विकास गाठण्याची धमक आहे.समाजातील वंचीत ,उपेक्षित,सर्वसामान्य तळागाळातील घटक त्याthe विकासापर्यंत निश्चितच पोहोचू शकणार नाही.हे सत्य नाकारून चालणार नाही.तर अशा गरजू,लाभार्थी व्यक्तीना त्या विकासाची कवाडे खुली करून देण्यासाठी प्रयत्न व्हावयास हवेत .तेव्हाच खऱ्या अर्थाने समानता आली असे म्हणता येईल. त्यांनाही आपल्याप्रमाणे जगण्याचा हक्क असून समाजव्यवस्था यांचे जगणंच स्विकारायला तयार नसते. त्यामुळे हे चिञ जर बदलावावयचं असेल तर आपला दृष्टिकोन बदलायला हवा, असे परखड मत यावेळी दिशाने व्यक्त केले. याचबरोबर लैंगिकता व असणारे गैरसमज याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
