अक्कलकोट : रियाज सय्यद 

श्रीमंत थोरले बाजीराव छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे वीर योध्दे होते. सुमारे पावणेदोन लाख किलोमीटर पेक्षा जास्त घोडयावरून प्रवास करून ४१ लढाया जिंकलेले लढवये योध्दे होते. पण आपण त्यांचा इतिहास चित्रपटापुरता मर्यादीत करून अवघ्या १७ महिन्याचा सहवास लाभलेल्या मस्तानी सोबत जोडुन त्यांच्या अतुलनीय युध्दनीतीचा अनादर करत आहेत. दोन तृतीयांश हिंदुस्थान एकछत्राखाली आणणारे बाजीराव प्रतापसुर्य होते असे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित  गणेशोत्सव व्याखानमालेत पहिले पुष्प राहुल सोलापूरकर यांच्या प्रतापसुर्य बाजीराव या विषयाने करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता एस टी. स्टँड समोरील लोकापूरे हॉल येथे बाजीराव प्रतापसुर्य हा विषय  रंगला.
प्रांरभी जेष्ठ नागरिक मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचा प्रांरभ करण्यात आला.

यावेळी महर्षि विवेकांनद संस्थेचे मल्लिनाथ कल्याणशेटटी,जेष्ठ नागरिक मल्लिकार्जुन लोकापुरे, सिध्दाराम कस्तुरे, इचगे, मडचाणे, गोविंदे,कलबुर्गी,
विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेटटी यांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करण्यात आले. ही व्याख्यानमाला २० संप्टेबर पर्यँत चालणार आहे.प्रतापसुर्य बाजीराव हा विषय उलगडताना राहुल सोलापूरकर यांनी चित्रपटातील इतिहास एकांगी असतात असे सांगुन बाजीरावांची युध्दतंत्रे,रणनीती यांचा इतिहास जाणुन घेणे गरजेचे आहे असे सांगितले.बाजीराव युध्दनीती वापरून परिस्थिती अनुकुल करून घ्यायचे.त्यासाठी त्यांनी वेगाने हालचाल करण्यासाठी साठी घोडदळ निवडले ख-या अर्थाने साम्राज्य निर्माण केले.विविध तंत्रे वापरून युध्दपरिस्थिती अनुकुल कशी करून घ्यायचे हे सांगुन बाजीरावांचा शोर्य उलघडुन दाखविले. विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी ,अशोक येणगुरे,शशिकांत लिंबीतोटे,संतोष जिरोळे,मल्लिनाथ मसुती,गुरुपादप्पा आळगी ,नितीन पाटील,महेश कापसे, चंद्रकांत दसले, एस.व्ही.कलबुर्गी, व्ही.एस.तळवार, मलकप्पा भरमशेटटी, व्ही.एस.बिराजदार, एस.बी.माने, आदीसह रसिक श्रोते उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रशांत पाटील यांनी करून दिला.

यावेळी मुख्याध्यापक गिरीश पटटेद,निलप्पा घोडके, मुख्याध्यापक हेगडे, आंनद कोरे, आर.बी.सावंत आदीसह महिला नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top