अक्कलकोट : रियाज सय्यद
अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांना मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा शाखेतर्फे मराठारत्न पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक शरद ठाकरे यांच्या हस्ते देवून गौरवण्यात आले. संघाच्या वतीने मराठा समाजातील साहित्य ,सामाजिक, पत्रकारिता, शेती ,उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सत्कार मूर्ती जन्मेजयराजे भोसले यांच्या वतीने बाबासाहेब निंबाळकर यांनी यावेळी मनोगत वाचन केले.
या सोहळ्यासाठी अक्कलकोटचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप सिद्धे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, बाबासाहेब कुलकर्णी, लाला राठोड, सागर गोंडाळ, राजू विभूते, अरविंद कोकाटे, बाळासाहेब निंबाळकर आदी उपस्थित होते.
