तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :
जि. प. उस्मानाबाद आयोजित गटशिक्षण कार्यालय तुळजापूर यांच्या मार्फत बालसाहित्य संमेलन घेण्यात आले. यामध्ये जि. प. प्रा.शाळा वडगाव(ला) शाळेतील विद्यार्थीनी पूजा हणमंत करंडे इ 7 वी हीने सादर केलेल्या 'आणि रस्ता हसायला' ही पर्यावरणपर नाटीका सादर केली. या नाटकाला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळले.तिचा सरपंच राजेंद्र करंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे साहेबराव करंडे, उपाध्यक्ष राजेंद्र गाढवे, उपसरपंच राजेंद्र मेटे यांच्या हस्ते सत्कार करुन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी मु. अ. हंगरगेकर संतोष, हुंडेकरी सतीश, कुरुम जयश्री, डाके रेखा, टारफे मॅडम यांची उपस्थिती होते. नाटिका सादरीकरणासाठी सतीश हुंडेकरी, श्रीम टारफे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.