काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशाला प्रशालेचा 14 वर्ष वयोगटातील हाॅलीबाॅल संघ नुकत्याच तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे दि. 20 ऑगस्ट रोजी झालेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम आला होता तर चिकुंद्रा येथे 11 ऑगस्ट रोजी झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. ही यशाची घौडदौड कायम ठेवत येडेश्वरी कन्या प्रशालेच्या 17 वर्षे वयोगटातील खो-खो संघानेही तुळजापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून यशाची परंपरा कायम राखली आहे.
या खोखो संघात कु.प्राजक्ता कुलकर्णी, कु.साक्षी ढगे, कु. वैष्णवी ढगे, कु. काविरा मासाळ,कु.सानिका काळे, कु.वैष्णवी घडमोडे,कु.वैदेही कुलकर्णी,कु.ऋतुजा शिंदे,कु.संजना दाणे, कु. गायत्री चव्हाण,कु.गायत्री मासाळ या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या सर्व खेळाडूंचे त्यांचे प्रशिक्षक तथा क्रिडाशिक्षक श्री कदम डी.आर, संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर सपाटे, व प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सहशिक्षक सुनिल खेंदाड, गणेश गुंगे, किशोर बनसोड, तुकाराम गवळी यांच्यासह पालक, ग्रामस्थांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.