तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :-

शनिवार दि. 8 सप्टेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे रोहन देशमुख साहेब यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्जवल  योजने अंतर्गत सावरगाव येथील सौ.काजल बालाजी लडके, दुर्गा शिवाजी लडके या लाभाथीॅना गॅस वाटप करण्यात आला. असे दहा लाभाथीॅना या वेळेस गॅस देण्यात आले. तसेच या वेळेस प्रगतशील शेतकरी जगन्नाथ काडगावकर व आप्पासाहेब बंडगर यांच्या देशमुख याचा हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. 

या वेळेस काटीचे सरपंच आदेश कोळी, प.स.सदस्य भिमराव कोळी उपस्थित होते. रोहन देशमुख यांनी मोदी सरकारने अनेक योजना महिलांसाठी राबविला जात आहेत. महिला वर्गांना चुल मुक्त करण्यासाठी गॅसचे वाटप केले जात आहे. रोहन देशमुख यांनी घेतलेल्या या कौतुकास्पद कार्यक्रमाचे स्वागत समस्त गावक-याच्यावतीने करण्यात आले.
 
Top