तुळजापूर : तुळजापूर येथे तालुका स्तरीय बाल साहित्य संमेलन घेण्यात आले. यात पोवाडा गायन स्पर्धेमध्ये शिरगापूर ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.
पोवाडा गायन स्पर्धा मध्ये तालुक्यातील प्रत्येक केंद्रातुन एक याप्रमाणे १४ शाळानी सहभाग नोंदविला. त्यामधुन प्रथम क्रमाक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगापूर शाळेला मिळाला. यामध्ये सहभागी विद्यार्थी कुमार चव्हाण ओम बालाजी, गायकवाड सौरभ जगन्नाथ, गायकवाड दिपक महादेव, माने संदिप सचिन, जाधव ज्ञानेश्वर विठठ्ल, जाधव श्रीकांत अनिल व तबला साथ श्री माने महेश , चव्हाण बालाजी पेटी वादक ढेपे सचिन विश्वनाथ, पाटील एम एम. आदींचे शाळेचे मुख्याध्यापक कानडे पी.आर., ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सुळ यानी विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करुन अंभिनंदन केले. यावेळी श्री चव्हाण जी.जी. यानी सुत्रसंचलन केले तर आभार श्रीमती गायकवाड एम.ए. यानी मानले.