तुळजापुर ( कुमार नाईकवाडी) :

बेकायदेशीर रित्या बांधकाम केल्या प्रकरणी तुळजापुरात सुनील फर्म इंजिनिअरींग कंपनी लातुर यांच्या विरोधात तुळजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुञाकडुन मिळालेली माहिती अशी की, सन 2011 ते 2015 या कालावधीत सुनिल फर्म इंजिनिअरीग कंपनी लातुर व इतर जणांनी मिळुन बीओटी तत्वावर तुळजापूर येथील नगरपालीका मालकीच्या असलेल्या सर्वे नं. 2 व आरक्षण क्रं.42 मध्ये शासनाच्या पुर्व परवानगी शिवाय व बनावट कागदपञा आधारे मंजुर नकाशा प्रमाणे बांधकाम न करता बेकायदेशीर पणे बांधकाम केली. यामुळे तुळजापुर नगर पालिकेची आर्थिक फसवणूक झाली असून नगरपालीकेची मालमत्ता बेकायदेशीर रित्या ताब्यात घेऊन व तिचा बेकायदेशीर रित्या वापर केल्याची तक्रार नगरपालिकेचे अभियंता अमर जनार्धन राऊत यांनी तुळजापूर पोलिसात दिल्यावरुन सुनिल फर्म इंजिनिअरींग लातुर व इतर जणांच्या विरोधात गु.न.304/18 कलम 420,465,468,471. 34 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.
 
Top