तुळजापूर : कुमार नाईकवाडी

तालुक्यातील काक्रंबा येथील जीवन विकास शिक्षण संस्थेचा पाच वर्षाचा कार्यकाळ लवकर संपणार असुन दि. २ ऑक्टोबर रोजी होणारी संस्थेची नविन कार्यकारणी मंडळाची निवडणूक कार्यक्रम हा सहाय्यक धर्मादय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय उस्मानाबाद यांच्या प्रतिनिधी मार्फत घेण्याची मागणी काक्रंबा येथील संस्थेच्या सभासदांनी निवेदनाद्वारे धर्मादय आयुक्ताकडे करण्यात आली आहे.

याबाबत काक्रंबा येथील जीवन विकास शिक्षण संस्थेच्या सभासदांनी उस्मानाबाद येथील सहाय्यक धर्मादय आयुक्ताकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, काक्रंबा गावातील जीवन विकास शिक्षण संस्था हि संपूर्ण ग्रामस्थांच्या लोक सहभागातुन उभारण्यात आलेली असुन सदरील संस्थेवर विदयमान संस्थाध्यक्ष हे शासनाच्या दुय्यम निबंधक या पदावर असताना आपल्या पदाचा गैरवापर करून सभासदांना कसल्या हि प्रकारे विश्वासात न घेता संस्थेची निवडून आजतागायत कागदोपञी घेऊन पदावर असल्याचा आरोप करुन निवेदनात पुढे म्हटले आहे की,  संस्थाध्यक्ष व तत्कालीन सचिव  हे दर पाच वर्षाला संस्थेची निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही मार्गाने न घेता सार्वजनिक नोंदणी कार्यालयाच्या परस्पर बेकायदेशीररित्या घेऊन काही मोजक्याच आणि मर्जीतील सभासदांना बोलवुन कागदोपञी निवडणूक घेत असल्याने या वर्षी सदरील संस्थेचा पाच वर्षाचा कार्यकाळ हा दि २ आंक्टोबर संपत आहे त्यामुळं संस्थेचे यंदाची निवडणूक प्रक्रिया हि सार्वजनिक न्यास नोदणी कार्यालय च्या प्रतिनिधी मार्फत घेण्याची मागणी संस्थेचे सभासदानी सहाय्यक धर्मादय आयुक्त उस्मानाबाद यांच्या कडे केली आहे.

या निवेदनावर श्रीहरी ढेरे, अशोक कंदले, महादेव गायकवाड, माणिक मदने, मोहन घोगरे, उध्दव माळी, वामन पांडगळे आदी सभासदाच्या सहया आहेत.

 
Top