तुळजापुर : कुमार नाईकवाडी
अखिल भारतीय छावा संघटनेच्या उस्मानाबाद नूतन जिल्हाध्यक्षपदी महेश मसाजी गवळी व काकासाहेब राऊत यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील आरळी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, बाळासाहेब पाटील, प्रताप कांचन, मराठवाडा अध्यक्ष जीवनराजे इंगळे, विष्णु कोळी, बाबासाहेब रोटे, विश्वजीत शिंदे, दादासाहेब सोजी, अमरभाई शेख, राहुल खपले, विशाल रोचकरी, विजय शिंगाडे, विजय पवार, भगवान माकणे, कुलदीप मगर, भीमराव व्हरकट, तानाजी पारवे, अरुण ज्योत, शिवाजी पारवे, सुधाकर उकरंडे, नरहरी कुलकर्णी, नागनाथ पाटील, यल्लानी काम्बले, किरण व्हरकट, बजरंग कोकाटे, काशीनाथ बंडगर, भगवान जाधव, अरुण पौळ, अनिल पारवे, अनिल जाधव, सुनील पारवे, राम पारवे, तानाजी व्हरकट, दगडू व्हरकट, रंगनाथ माने, संजय पारवे, व्यंकट पाटील, पापालाल सय्यद, गोविंद पारवे, शाखाध्यक्ष सचिन व्हरकट यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख,विविध शाखा प्रमुख आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजपर्यंत छावा संघटनेचे कार्य करीत असताना मयत झालेले पदाधिकारी व मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या सर्व बांधवांना तसेच स्वर्गीय अण्णासाहेब जावळे-पाटील यांना यावेळी सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
आरळी बु ग्रामस्थ यांच्या वतीने जरीचा फेटा, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,51 किलो वजनाचा गुलाबफुलांचा हार घालून मान्यवारांच्या हस्ते महेश गवळी व काकासाहेब राऊत यांचा सत्कार करण्यात आला तसेच मराठा आरक्षण आंदोलनात जिल्ह्यातील 29 छाव्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असता त्यांना अटक झाली होती त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. आरळी बु छावा संघटनेच्या गाव शाखाध्यक्ष पासून ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत प्रवासात अनेक आंदोलन, विविध उपक्रम यशस्वी करीत आपला ठसा कायम ठेवल्याने हा सन्मान प्राप्त करता आला.
यावेळी गावकऱ्यांच्या वतीने संजय पारवे, पत्रकार धनंजय रणदिवे, जीवनराजे इंगळे, नानासाहेब जावळे पाटील, महेश गवळी,काकासाहेब राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करीत कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्यां आरळीकरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल जाधव यांनी तर सुत्रसंचालन विकास ज्योत यांनी केले. आभार धैर्यशील नारायणकर यांनी मानले.
