उस्मानाबाद : परकीय थेट गुंतवणुकीमध्ये किरकोळ वस्तूंच्या उत्पादन व व्यापारास केंद्र सरकारने थेट मान्यता दिली आहे. या विरोधात कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली या संघटनेने शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी दिली आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष शामसुंदर बांगड हे होते. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव, उपाध्यक्ष संजय मोदाणी, धनंजय जेवळीकर, संतोष कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी परकिय थेट गुंतवणुकीमुळे किरकोळ वस्तूंच्या उत्पादन व व्यापारास भारत सरकारने मान्यता दिलेली आहे. तसेच ‘फ्लिपकार्ट’ ही ऑनलाईन व्यवसाय करणारी कंपनी वॉलमार्ट या जागतिक बलाढ्य कंपनीद्वारे खरेदी करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या परकीय धोरणांना बगल देऊन वॉलमार्टने भारतातील किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भारतातील कपडे दैनंदिन वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, किराणा, मेडीकल आदीसह सर्व क्षेत्रातील किरकोळ परिणाम होणार आहे. त्यामुळे भारतातील बेकारी बेरोजगारी वाढून भारतीय उत्पादक किरकोळ व्यापारी अडचणीत येणार आहेत. किरकोळ व्यापारावर एफडीआय व वॉलमार्ट, फ्लिपकार्टच्या रुपाने येत आहे. हे संकट दूर करण्यासाठी व्यापार्यांनी आपली एकजूट कायम ठेवून येत्या शुक्रवार, 28 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या देशव्यापी बंदमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाने केले आहे.